माळीनगर प्रतिनिधी संजय लोहेकर तेज न्यूज
सांगली शिक्षण संस्था सांगली यांचे मार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या गुणवत्ता शोध परीक्षा २०२५/२६ मध्ये अकलूज केंद्रातील माळीनगर येथील सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळा क्रमांक १ मधील इयत्ता तिसरीच्या वर्गातील विद्यार्थी शिवराज महेश सुरवसे हा अकलुज केंद्रामध्ये २३६ गुण मिळवून पहिल्या क्रमांकाने पास झाला आहे.या परिक्षेत जवळपास १२५ विद्यार्थी बसले होते पैकी जवळपास 75 विद्यार्थी पास झाले बहुतांश पास झालेले विद्यार्थी माळीनगर येथील याच संस्थेतील आहेत.
या मिळविलेल्या यशाबद्दल दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे संस्थेचे चेअरमन राजेंद्र गिरमे,सेक्रेटरी अजय गिरमे, शिक्षक बुगड व अन्य सहकारी यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.परीक्षा माळीनगर केंद्रामध्ये घेण्यात आली.
या परीक्षेत प्राधान्याने संस्थेच्या नावलौकिकात भर पडली संस्थेकडून शिवराज महेश सुरवसे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचा व अन्य विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिवराज सुरवसे याने यापुर्वी अनेक परीक्षेत नाविन्यपूर्ण यश संंपादन केले आहे.शिवराज हा येथील उद्योजक महेश सुरवसे यांचा पुत्र असून यशवंतनगर येथील पत्रकार तुकाराम उबाळे (मास्तर) यांचा तो नातू आहे माळीनगर व पंचक्रोशीत त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


