पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
विवेक वर्धिनी विद्यालयाचे उप मुख्याध्यापक विलास दराडे व पर्यवेक्षक मधुकर भोसले यांच्या सेवानिवृत्ती निमित्त विवेक वर्धिनी कनिष्ठ महाविद्यालय येथे सत्कार समारंभ करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक आप्पासाहेब चोपडे हे होते त्यांनी दराडे व भोसले यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या व त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्या बद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी प्राचार्य डॉ. मुंढे यु. आर.यांनी आपल्या मनोगत मध्ये दराडे व भोसले यांनी प्रशालेमध्ये , कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या हितासाठी खूप चांगले काम केले असल्याने ते आता समाधानकारपणे निवृत्त होत असल्याचे सांगितले. यावेळी सत्कारमूर्तींचा सत्कार संस्था, प्रशाला ,विविध विभागातर्फे करण्यात आला. सत्कारमूर्तींनी आपल्या सेवकालातील विविध आठवणींना उजाळा दिला व संस्थेने काम करण्यास संधी दिल्याबद्दल संस्थेची कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी संस्थेची ज्येष्ठ संचालक अनिरुद्ध सालविठ्ठल तसेच विजय माळवदकर , दत्त विद्या मंदिर चे मुख्याध्यापक अविनाश कटकधोंड हे उपस्थित होते यावेळी पर्यवेक्षक अशोक पवार यांनी प्रास्ताविक केले ,विजय सावंत व दिलीप रानगट्टे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमासाठी उप प्राचार्य शिंदे ई.जी.मुख्य लिपिक हनुमंत मोरे तंत्र विभाग प्रमुख नानासाहेब देवकते , माजी प्राचार्य सुधाकर पिसे, राजेंद्र पाराध्ये हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका जरे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक, विवेक वर्धिनी विद्यालय, दत्त विद्या मंदिर सुस्ते येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सत्कारमूर्तींचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमानंतर सर्वां साठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

