पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते शाल, पेढे पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी भाळवणीचे उपसरपंच नितीन शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना माळशिरस शहर प्रमुख अशोक देशमुख, मंदिर व्यवस्थापन अधिकारी प्रविण कुमार घम, पोलीस अधिकारी नितीन होळकर व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी संभाजी शिंदे म्हणाले की तेज न्यूज चे संपादक प्रशांत माळवदे यांना नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर यांचा डिजिटल मीडियातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रशांत माळवदे यांना पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बातम्या आपल्या डिजिटल मीडिया वर कायम स्वरुपी प्रसिद्ध करत आहेत.त्याबद्द्ल मंदिर समिती सदस्य म्हणून मी सत्कार करत आहे.असे संभाजी शिंदे म्हणाले.
यावेळी प्रशांत माळवदे यांनी सर्वांचे आभार मानले.


