पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे दहावी आणि त्यानंतर प्रश्न पडतो दहावीनंतर पुढे काय? हा प्रश्न विद्यार्थी आणि पालक दोघांसाठीही चिंतेचा विषय असतो. या महत्त्वाच्या आणि निर्णायक टप्प्यावर योग्य दिशा मिळावी आणि करिअर निवडीतील संभ्रम दूर व्हावा, यासाठी माईर्स एमआयटी पुणे संचालित, एमआयटी विश्र्वशांती गुरुकुल वाखरी, पंढरपूर येथे एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या वतीने शनिवार, दिनांक ११ एप्रिल रोजी विशेष करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती प्राचार्य स्वप्निल शेठ यांनी तेज न्यूज ला दिली आहे.
या करिअर मार्गदर्शन विशेष चर्चसत्रात प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि करिअर समुपदेशक विवेक वेलणकर विद्यार्थी व पालकांना दहावीनंतर करिअरची निवड कशी करावी आणि विविध क्षेत्रातील संधींविषयी सखोल मार्गदर्शन करणार आहेत. तसेच एनडीए (NDA) म्हणजेच संरक्षण क्षेत्रातील करिअरच्या संधींविषयी कर्नल डी. के. उपाध्याय मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या बदलत्या काळात उपलब्ध असलेले विविध करिअरचे पर्याय, यासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षा कोणत्या आणि त्यांची तयारी याविषयी सखोल मार्गदर्शन यावेळी करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यास योग्य दिशा देण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुलतर्फे करण्यात आले आहे.
कार्यक्रमातील मार्गदर्शनाचे प्रमुख विषय:
NDA, JEE, NEET, NAVY यांसारख्या प्रवेश आणि स्पर्धा परीक्षांची प्रभावी तयारी कशी करावी
सायन्स व कॉमर्स शाखांमधील आधुनिक व उच्च संभाव्यतेचे करिअर पर्याय
योग्य कोर्स निवडीसाठी आवश्यक निकष व भविष्यातील आव्हाने
विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या सर्व शंकांचे थेट निरसन
विशेष वाहतूक सुविधा:विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पंढरपूर येथील बस स्टँड, अर्बन बँक, शिवाजी महाराज चौक व ठाकरे चौक येथून दुपारी ४.३० वाजता बसची विनामूल्य व्यवस्था करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती पुढील प्रमाणे दिनांक शनिवार, ११ एप्रिल २०२६ वेळ: सायंकाळी ५.०० ते ७.०० स्थळ: एमआयटी विश्वशांती गुरुकुल कॅम्पस सभागृह, वाखरी पालखीतळ, पंढरपूर प्रवेश: सर्व १० वी उत्तीर्ण विद्यार्थी व पालकांसाठी पूर्णपणे मोफत आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी ९२०९०४३७३९ या क्रमांकावर संपर्क साधावा.


