स्विमींग ग्रुपच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी.
नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले अभिवादन.
अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
महात्मा बसवेश्वर (बसवण्णा) महाराज हे बाराव्या शतकातील कर्नाटकातील महान संत होय. ते समाज सुधारक आणि लिंगायत धर्माचे संस्थापक होते. ब्राह्मण कुटुंबात जन्म होऊनही त्यांनी उपनयन नाकारले आणि 'जन्माने नाही तर कर्माने माणूस मोठा' हा विचार समाजासमोर मांडला.
कायकवे कैलास याचा उच्चार म्हणजे काम हेच पूजास्थान मानून श्रमाला सर्वश्रेष्ठ मानले. त्यांचे 'कर्म हीच पूजा श्रम हेच धन' हे तत्त्व बसवेश्वर महाराजाचे महात्म्य सांगणारे असल्याचे मनोगत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक व स्विमींग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महेश इंगळे यांनी व्यक्त केले. आज येथील स्विमींग ग्रुपच्या वतीने संस्थापक अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महेश इंगळे यांनी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी स्विमिंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महेश मालक इंगळे, दुधनी नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक डॉ.उदय म्हेत्रे, अप्पू मालक पराणे, ओंकार उटगे, संतोष जवळगे,
डॉ.राजू मलंग, अंकुश केत, बाळासाहेब एकबोटे, महादेव आडीवीतोटे, चंद्रकांत सोनटक्के, रमेश शिंदे, विद्याधर गुरव, प्रथमेश इंगळे, कमलाकांत भासगी, मल्लिनाथ माळी, अशोक कलशेट्टी सर, कुमार हतुरे, रमेश कणमुसे, सचिन किरनळी, दशरथ लोंढे, शशिकांत पराणे, सुनील पवार, हनुमंत माळी, राजू एकबोटे, अरविंद पाटील, बाबा सुरवसे, सिद्धाराम बिडवे, शैलेश राठोर, अमर पाटील, मनोज जगताप, श्रीकांत झिपरे व नागरीक उपस्थित होते.

