पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
देशस्थ नामदेव समाजोन्नती परिषद श्री क्षेत्र आळंदी जि.पुणे या नोंदणीकृत संस्थेचे अध्यक्ष कै. शशिकांतराव कडदेकर यांचे निधन झाल्यामुळे संस्थेच्या कार्यकारी मंडळातील रिक्त पदी म्हणजेच अध्यक्षपदी भालचंद्र गणपत निखळ तथा बाळासाहेब निखळ (चाकण) यांची कार्यकारी मंडळाच्या झालेल्या सभेत अध्यक्ष म्हणून सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संस्थेचे दिवंगत अध्यक्ष कै. राघवेंद्र चिंबळकर यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वीच्या आजारपणाच्या काळात अध्यक्षपदाचा कार्यभार प्रभारी अध्यक्ष म्हणून भालचंद्रजी निखळ यांच्याकडे सोपवावा, अशी इच्छा व्यक्त करून तशा प्रकारचे लेखी निवेदन देखील संस्थेकडे सादर केलेले होते.
या गोष्टीचे स्मरण ठेवून व त्या गोष्टीला उजाळा देऊन कैलासवासी साहेबांच्या इच्छेचा आदर करून त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करावी, या हेतूने सर्वांनुमते ठराव करून भालचंद्र गणपत निखळ यांची आळंदी धर्म शाळेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
त्यांनी आत्तापर्यंत संस्थेसाठी केलेल्या कार्याचा विचार करता ते भविष्यात देखील या पदाला चांगल्या प्रकारे न्याय देतील आणि संस्थेचे व पर्यायाने संपूर्ण समाजाचे नेतृत्व चांगल्या प्रकारे , निर्भीड पद्धतीने व सर्वांना सोबत घेऊन करतील असा विश्वास संचालक मंडळास वाटतो. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांच्याकडून संस्थेच्या माध्यमातून भावी काळात उत्तम असे समाजोपयोगी धार्मिक, अध्यात्मिक व सांप्रदायिक कार्य सक्रिय व चांगल्या पद्धतीने घडावे यासाठी हार्दिक शुभेच्छा..!!
पुन्हा एकदा संस्थेच्या व समस्त शिंपी समाजाच्या वतीने भालचंद्रजी निखळ यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन..!!समस्त नामदेव शिंपी समाज युवक संघ, महाराष्ट्र राज्य पदाधिकारी सभासद व समाज बांधव यांनी अभिनंदन केले आहे.

