पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील मार्मिक संवाद प्रकाशनच्या माध्यमातून रविवार दिनांक 10 मे, 2026 रोजी असणाऱ्या जागतिक मातृत्व दिनाच्या औचित्याने राष्ट्रीय स्तरावरील 'वात्सल्यस्नेहाची अमृतधार - आई...' हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात येणार आहे.
त्यासाठी भारतातील मराठी भाषिक कवी आणि कवयित्री यांच्याकडून आई विषयक काव्यरचना मागविण्यात आल्या आहेत. तरी 25 एप्रिल, 2026 पूर्वी पोहोचतील अशा पद्धतीने प्रत्यक्ष, पोस्टाने, कुरिअरने किंवा व्हाट्सअपच्या माध्यमातून कविता पोहोच कराव्यात असे मार्मिक संवाद प्रकाशनच्या माध्यमातून कळविण्यात आले आहे.
तरी ज्या मराठी भाषिक कवी आणि कवयित्रींना 'वात्सल्यस्नेहाची अमृतधार - आई...' या काव्यसंग्रहामध्ये कविता प्रकाशित करण्याची इच्छा आहे. त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी कवी रवि वसंत सोनार (9922514300) यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मार्मिक संवाद प्रकाशनच्या वतीने करण्यात आले आहे.

