पंढरपूर प्रतिनिधी अमोल कुलकर्णी तेज न्यूज
जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या खर्डी येथे "गॅंग ऑफ खर्डी " या नावाने विविध सामाजिक, शैक्षणिक,राजकीय,कृषी विषयक माहिती साठी व्हाट्सअप सदस्य समूह पत्रकार अमोल कुलकर्णी यांनी बनवलेला आहे. यातील सदस्यांना गावातील विविध समस्या बाबत,शासनाचे विविध धोरणे बाबत जागरूक केले जाते.
गावातील विषय गावातच मिटावेत या हेतूने सुरू केलेल्या ग्रुपमध्ये उंबरगाव-खर्डी रेल्वे पुलाखाली परावर्तित आरशांची गरज या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने लोक वर्गणी गोळा करण्यात आली.यातून जवळपास 18 हजार रुपये जमा झाले.हा उपक्रम पाहून पंढरपूर रोटरी क्लब ने एक, हाडांचे डॉक्टर तसेच रोटरी अध्यक्ष वैभव सादगिले यांचे कडून एक आणि मयुरेश परिचारक यांच्याकडून एक असे तीन आरसे मोफत मिळाले.
एकूण 6 आरसे गावातील धोकादायक वळणावरती बसून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.या कामे गावातील अनेकांनी 10 रुपये ते हजार रुपयापर्यंत यथाशक्ती लोकवर्गणी गुगल पे फोन पे द्वारे तसेच रोख दिली. या आरशामुळे उंबरगाव, बोहाळी,शिरभावी,पाटील मळा येथून येणाऱ्या शाळकरी मुले वाहनचालक पादचारी प्रवाशांना भाविकांना सहाय्य होऊ लागले.
या सार्वजनिक कार्याचे खर्डी व पंचक्रोशी मध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.अशा जवळपास 60 विधायक कामांची यादी या ग्रुप द्वारे कार्यान्वित होणार असल्याने गावातील अनेक प्रश्न गावातच सुटण्यासाठी सोशल मीडियाचा असाही वापर करता येतो हे एक प्रघात गॅंग ऑफ खर्डी या ग्रुपने तयार केला आहे.या कामी प्रवर्तक अमोल कुलकर्णी,अनिल कांबळे तसेच ग्रामस्थ खर्डी व मिस्तरी रवी शिंदे करकंब यांचे सहकार्य लाभले.

