अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी तेज न्यूज
ठाणे शहर पोलीस कॉन्स्टेबल म्हणून निवड झाल्याबद्दल कु.प्रेरणा दत्तात्रय माने हिचा येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे साहेब व प्रथमेश इंगळे यांनी श्री, स्वामी समर्थांचे कृपावस्त्र देवून सन्मान केला.
यावेळी परस्थितीशी संघर्ष करत तिने मिळवलेल्या यशाबद्दल युवा नेते प्रथमेश मालक इंगळे यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी
होमगार्ड शैला थोरात, सागर गोंडाळ, प्रसाद माने, तन्मय इचगे, गणेश इंगळे, समीर नाईक, महेश मस्कले, शंकर मलवे व अन्य उपस्थित होते.

