मुंबई प्रतिनिधी पत्रकार भारत कवितके तेज न्यूज
एसटी महामंडळाच्या एनसीएमसी कार्ड मिळविण्यासाठी महिला व जेष्ठ नागरिक यांची सर्वत्र केवळवाणी धडपड सुरू असल्याचे आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांना आढळून आले आहे .
आधार कार्ड व मोबाईल यांच्या सहाय्याने हे कार्ड मिळविता येते,पण आमचें प्रतिनिधी भारत कवितके यांनी रांगेत उभे असलेल्या जेष्ठांशी संवाद साधला असता कळाले की," ज्येष्ठांच्या मोबाईल वर ओटिपी नंबर येत नाही,नेट, सर्व्हर समस्या, या मुळे दोन तीन तास रांगेत उभे राहून ही घरी परत जावे लागते.काही ठिकाणी तर अपुऱ्या शेड मुळे ज्येष्ठांना तासनतास कडक उन्हात उभे राहावे लागते आहे, महामंडळाने ज्येष्ठांना घरपोच पोस्टाने पाठविण्याची व्यवस्था केली असती तर बरे झाले असते, आधार कार्ड वर जन्म तारीख असताना परत अजून हे कार्ड काढण्याची महामंडळाला खरंच गरज होती का? पारदर्शकता यावी म्हणून कारण दिले जाते,हे कितपत योग्य आहे,? एसटी स्थानकाच्या शौचालय,शेड मधील बंद पंखे, आवारातील डांबरीकरण, स्वच्छता, स्थानकात अस्ताव्यस्त पडलेले दारुडे, गर्दुल्ले, भिकारी, मोकाट कुत्री याचा विचार महामंडळाने करून सुधारणा करावी. एनसीएमसी कार्ड महिला व ज्येष्ठांना सुलभपणे कसे मिळेल याचा विचार महामंडळाने करावा, यातील समस्या अडचणी दूर कराव्यात...."
कार्डच्या रक्कम बाबत ही गोंधळ उडाला आहे.काही ठिकाणी २२० ते २५० रुपये पर्यंत रक्कम महिला व ज्येष्ठ नागरिकांन कडून घेतले जात आहे. याबाबत एस टी महामंडळाने खुलासा करणे आवश्यक आहे.
ही योजना किती कालावधी पर्यंत सुरू राहील हे स्पष्ट सांगितले जात नाही. त्यामुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांना उन्हात रांगेत उभे राहून कार्ड काढावे लागत आहे.याचा परिणाम गर्दी होताना दिसून येत आहे.
तरी एस टी महामंडळाने कार्ड काढणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांची सेवा सुरू करावी.व रक्कम बाबत आणि कालावधी विषयी खुलासा करावा अशी मागणी प्रवासी करत आहेत.


