माळशिरस प्रतिनिधी संजय निंबाळकर
झिंजेवस्ती येथे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत जगन्नाथ नरळे यांचे घर पूर्णपणे जळून खाक झाले असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच सभापती दत्ताभैया मगर तात्काळ घटनास्थळी भेट देत नरळे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी त्यांचे सांत्वन करत या कठीण प्रसंगी धीर दिला तसेच शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन देत मदतीची घोषणा केली व दोनच तासात मदत पोच केली.
यावेळी बाबुराव कदम (मार्केट कमिटी संचालक), प्रकाश पाटील मा.सरपंच सौ.पूजा दत्ताभैया मगर, वस्ताद मोहन मदने पाटील, शामराव गलांडे मा.उपसरपंच किशोर कदम माउपसरपंच, राष्ट्रवादी काँग्रेस माळशिरस प्रवक्ता माननीय श्री.लहू पाटील, युवानेते रंजीत पाटील, विश्वनाथ मगर (बापूराव), संजय मगर जयसिंग मोरे प्रदीप मगर शब्बीर मुलानी महेश मगर यश सुर्वे सुरज मगर आदी मान्यवर उपस्थित होते.

