म्हसवड प्रतिनिधी सचिन सरतापे तेज न्यूज
म्हसवड, ता. माण जि. सातारा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त क्रिटीकेअर हॉस्पिटल, वडुज एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय मंहमदवाडी, हडपसर पुणे संलग्न व जय भिम युवक मंडळ, म्हसवड यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आयु. सारंग लोंढे यांनी सांगितले
यामध्ये दि.12 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत पर्यंत रक्तदान शिबीर असून रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू व आयुष्यभर रक्तबॅग मोफत मिळणार आहे
यासाठी आयुष ब्लड बँक वडूज यांचे मोलाचे योगदान असणार आहे दि.13 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.00 ते 03.00 पर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले असून डॉ. अंकिता गांधी (फलटण) M.B.B.S., DNB (Gen.Surgery)Fellowship in Neonatology डॉ. स्नेहल राणे (वडूज) M.B.B.S., DNB (Gen.Surgery) Fellowship in Urology डॉ. योगेश फरांदे (सातारा) Audiologist & Speech थेरपीस्ट मोफत अॅडोमेट्री तपासणी,डॉ. तेजस गांधी (फलटण)M.B.B.S., M.S.(Ortho) अस्थिरोग तज्ञ यांचे मार्गदर्शनातं आरोग्य शिबीर संपन्न होणार आहे.
या शिबाराची वैशिष्ट्येM.2D ECHO वर ५०% सवलत Lab Test वर ४०% सवलत'X' Ray २००/- फक्त,ECG मोफत साखर तपासणी मोफत (स्ट्रीपवर) नेत्र तपासाणी मोफत मोतिबिंदू शस्त्रकिया शस्त्रक्रियेसाठी लेन्सचा वापर यासाठी मोफत प्रवास,मोफत जेवण,मोफत औषधे,मोफत काळा चष्मा व डोळ्यांचा नंबर काढून सवलतीच्या दरात नंबरचा चष्मा मिळणार आहे त्याचबरोबर मोतीबिंदू शस्त्र क्रिया पुणे येथील प्रसिद्ध एच. व्ही देसाई नेत्र रुग्णायल मोहम्मदवाडी पुणे येथे करण्यात येईल.
ऑपरेशनची गरच असल्यास MJPJAY या योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया ही केल्या जातील.
सलग 3 दिवस सामाजिक उपक्रम पुस्तकं प्रदर्शन सोहळा व पुस्तकं स्टॉल, सर्व महामानवांचे लोगो फोटो फ्रेम स्टॉल (आर. के. फोटो म्हसवड ), महा ई सेवाकेंद्र सागर सोनवणे यांचे केंद्र, पोस्ट ऑफिस च्या सहकार्याने आधार अपडेट केंद्र या मार्फत विविध सुविधा मिळणार आहेत.
या कार्यक्रमासाठी उपस्थिती सुशांत बनसोडे प्रांताधिकारी सोलापूर, उजवला गाडेकर प्रांताधिकारी माण -खटाव जीवन बनसोडे तहसीलदार इंदापूर, विकास आहीर तहसीलदार माण, मीना बाबर अप्पर तहसीलदार, म्हसवड , वैशाली कडुकर अप्पर पोलीस प्रमुख सातारा, सचिन माने मुख्याधिकारी म्हसवड नगरपरिषद म्हसवड दत्तात्रय दराडे API म्हसवड पोलीस स्टेशन यांची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यकमाचे खास आकर्षण प्रा. विठ्ठल कांगणे संचालक स्वामी विवेकानंद करिअर अकेडमी लातूर यांचे व्याख्यान होणार आहे. यामध्ये सत्कारमूर्ती यांचा सत्कार हे सर्व कार्यक्रम म्हसवड नगरपरिषदे समोर होणार असून म्हसवड व परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घेणेचे आवाहन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व कार्यकारणीने केले आहे.



