सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंटरनॅशनल अंतर्गत डिस्ट्रिक्ट ३२३४ डी - १ लायन्स क्लब सोलापूर सिटीच्या वतीने जागतिक कामगार महिला जागतिक महिला दिन दिनांक१०/३/ २६ वार मंगळवार. संध्याकाळी ०७/३०वाजता स्थळ अक्कलकोट रोड एमआयडीसी दर्शन गारमेंट येथे संपन्न झाला. राजुसा शालगर, सिद्धेश्वर गारमेंट चे चन्नबसू माळगे, गुरु शालगर उपस्थित होते.
लायन्स क्लबचे सोलापूर सिटीचे अध्यक्ष लायन मोहन भूमकर यांनी महिला दिनाबद्दल विशेष माहिती देऊन त्यांच्या महिला कामगाराचा जागतिक महिला दिन औच्छित साधून भेट वस्तू देउन सत्कार करण्यात आला. यावेळी महिला कामगार आणि त्यांचे कुटुंबीयांची उपस्थिती होती.शेवटी आभार चन्नबसू माळगे यांनी केले.

