वर्धा प्रतिनिधी तेज न्यूज
बेलदार समाज संघटना तत्सम जाती महिला शाखा वर्धा मार्फत जागतिक महिला दिन, ग्रीन वेली अँड टुरिझम अँड पार्क रीधोरा जिल्हा वर्धा येथे आयोजित करण्यात आला.
निसर्गाच्या सानिध्यात आम्ही सर्व महिलांनी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला, त्यामध्ये अनेक विषयावर संभाषण झाले, त्यामध्ये सामाजिक, शिक्षण कला कौशल्य, आणि सध्याच्या परिस्थितीवर विचार विनिमय करण्यात आले.
या मध्ये मंचावर उपस्थित सोनाली कोपुलवार व्ही जे एन टी जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी वर्धा सौ अरुणाताई कोटेवार विदर्भ बेलदार समाज महिला जिल्हा अध्यक्ष, अश्विनी दांडलेवार' प्रांतिय सदस्य तालेवार ताई, आकुलवार ताई , आणि सर्व कार्यक्रमाची जबाबदारी नेहा चीनेवार, सीमा कोटेवार, नीलिमा सिंगम, वैशाली मेंढेवार, धनश्री आकुलवार, आरती कोटेवार, गुंडलवार ताई, मायाताई आकुलवार, यांनी सर्वांनी सहकार्य केले अशा प्रकारे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


