पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मधील कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने ‘कोडमाइंड एआय हॅकेथॉन २०२६’ हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार यांच्या सहकार्याने, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार व विभागप्रमुख डॉ. प्राजक्ता सातारकर यांच्या नेतृत्वाखाली ‘कोडमाईंड एआय हॅकेथॉन २०२६’चे आयोजन केले होते. दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘सायन्स अँड एआय इनॅबल्ड आर अँड डी’ ही या हॅकेथॉनची मुख्य संकल्पना होती. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार हे लाभले होते. दिपप्रज्वलनानंतर डॉ. डी.बी. हंचाटे यांनी प्रास्ताविकात ‘हॅकेथॉन’ या स्पर्धेविषयी सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुणे डॉ.प्रशांत पवार यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये एआयचे मूलभूत तत्त्वज्ञान, आजच्या युगातील एआय समोरील आव्हाने, तसेच संशोधन, उद्योग व समाजासाठी एआय मधील संधी यावर त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या हॅकेथॉन स्पर्धेमध्ये एकूण ८७ संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये ४३५ विद्यार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण एआय-आधारित प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशील कल्पना, तांत्रिक कौशल्य व संशोधनाभिमुख दृष्टिकोन याचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले. परीक्षक म्हणून डॉ.आर. आर. गिड्डे, डॉ. डी.डी.रोंगे, प्रा.एम. वाय. शेख, प्रा.भाग्यश्री देशमुख, प्रा. व्ही.डी.जाधव, डॉ. अभिषेक एम. एस. यांनी प्रकल्पांचे मूल्यमापन केले.
यामधून प्रथम क्रमांक सुशांत थडगे आणि त्यांचा संघ, उपविजेता संदीप गवळी व त्यांचा संघ, द्वितीय उपविजेता बालाजी माने व त्यांचा संघ आणि साक्षी वाघ व त्यांचा संघ या दोन्ही संघात विभागून देण्यात आला. विजेत्या संघांना प्रमाणपत्र व रोख पारितोषिके देण्यात करण्यात आली. ‘कोडमाइंड एआय हॅकेथॉन २०२६’ मुळे विद्यार्थ्यांना संशोधन, नवकल्पना व कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील व्यावहारिक अनुभव मिळाल्याने हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. अरविंद बगले यांनी काम पहिले. यामध्ये उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन केल्याचे दिसून आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पियुष चोपडे, राहुल मदने, मोहसिन पटेल, संकेत शेटे, संदीप गवळी, रुतुराज गांडुळे, श्रावणी खटावकर, प्रीती चंडक, सानिका तोगी, कोमल जगदाळे, श्रावणी कवले, प्रज्ञा गोरे, प्रतीक्षा ढेरे आणि इतर स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी पियुष चोपडे, राम पोतदार व श्रावणी खटाव यांनी केले तर आभार समन्वयक प्रा. सारिका हजारे यांनी मानले.

