इस्लामपूर प्रतिनिधी तेज न्यूज
नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सांगली जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरदचंद्र पवार गट) अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या विजयाचे शिल्पकार आणि पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी आज इस्लामपूर येथे त्यांची भेट घेतली.यावेळी नागेश फाटे यांनी जयंतराव पाटील यांचा श्री भगवंत पांडुरंगाचा आशीर्वाद मानल्या जाणाऱ्या पवित्र तुळशीच्या हाराने सत्कार करून त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
केवळ सत्कारच नव्हे, तर या विजयाची ऊर्जा ज्या विचारांतून मिळाली, त्या सहकारमहर्षी स्व. राजाराम बापू पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास नागेश फाटे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. "हा विजय बापूंच्या विचारांचा आणि जयंतराव पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाचा विजय आहे," अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
या विजयामुळे सांगली जिल्ह्यात पक्षाची पकड अधिक मजबूत झाली असून, उद्योग व व्यापार विभागातही आनंदाचे वातावरण आहे. नागेश फाटे यांच्या या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून आगामी काळात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार असल्याचे समजते.
ह्या वेळी राष्ट्रवादी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, उद्योजक नवनाथ बचूटे व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

