सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलच्या वतीने अध्यक्ष लायन प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी,माजी अध्यक्ष लायन चंद्रकांत यादव व इतर सदस्यांच्या सहकार्याने सोलापुरातील जोड बसवण्णा चौक येथे निराधार विजयाताई बनसोडे यांना लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल कडून लायन्स छत्री देण्यात आली.
क्लबचे अध्यक्ष लायन प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी म्हणाले की, "महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या साक्षीने सेवा कार्य आमच्या हातून घडतोय हे आमच्या पूर्व जन्माची पुण्याईच म्हणावे लागेल. गोरगरीब दीनदुबळे,पददलिततांची सेवा हीच ईश्वर सेवा हा उदात्त हेतू समोर ठेवून "आम्ही सेवा करतो" या उदात्त्य भावनेने नुकतेच विजया दीपक बनसोडे यांचा आधार पती दीपक स्वर्गवासी झाले. त्यानंतर विजयाताईंनी धीर न सोडता कसेबसे करून तुटपुंज्या पैशावर आपल्या मुलांसह फ्रुट स्टॉलचा व्यवसाय सुरू केला.
परंतु उन्हाळ्याच्या दिवसात फ्रुट हे उन्हाने खराब होऊ नये,याकरिता विजयाताईंना डोक्यावर छत्र असावा, म्हणून लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलच्या वतीने महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सप्ताहाच्या सुरुवातीसच लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल कडून छत्री देऊन सहकार्य करण्यात आले. त्याप्रसंगी श्रीमती विजया दीपक बनसोडे, गोपाळ दीपक बनसोडे व आदी सदस्य उपस्थित होते.

