अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
शिवरत्न गणेश उत्सव मंडळ व सेवाभावी संस्थेच्या वतीने 'श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा', शुक्रवार दिनांक ६ रोजी होणार असून गणेश भक्तांनी बहुसंख्येने उपस्थित राहून सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी केले.
श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व त्रिकालवंदनीय श्री सद्गुरु सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते होणारा असून त्यानिमित्त गुरुवारी दि.५ रोजी सकाळी ९.३० वाजता शोभायात्रा निघणार आहे.
तसेच दुपारी दोन ते पाच या वेळेत गणेश स्तवन, गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नक्षत्र देवतापूजन, नांदीश्राद्ध, वास्तु शुद्धीकरण प्राण शुद्धीकरण, कंकण बंधन, जलाभिषक जलाधिवास, धान्याधिवास, शैय्याधिवास, मुख्य देवता स्थापन, पीठ पूजन व पीठ स्थापन आदी विविध कार्यक्रम होणार असून सायंकाळी 5:30 वाजता आरती व प्रसाद तर शुक्रवार रोजी सकाळी ७ ते १ वा दरम्यान पिठ देवता पूजन, गणेश स्तवन, अग्नी स्थापन, अग्निपूजन, मुख्य देवता पूजन, अभिषेक, वर्णिदान, अग्निहवन मूर्ती संस्कार हवन यासह मुख्यमूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण पूर्णाहूती होणारा असून दुपारी एक ते चार या वेळात महाआरती व महाप्रसाद होणारा आहे. तरी या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले.

