उमा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
उमा महाविद्यालय पंढरपूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी या गावी दिनांक ५ जानेवारी ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचा सांगता समारोप संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर या संस्थेचे अध्यक्ष मा.आमदार प्रशांतराव परिचारक होते.
आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मा. आमदार प्रशांतराव परिचारक म्हणाले की " राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभागी स्वयंसेवक विद्यार्थ्यामध्ये नेतृत्व, देशप्रेम, स्वयंशिस्त, श्रमप्रतिष्ठा हे गुण विकसित होऊन सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होते. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान आहे असे त्यांनी प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. अविनाश देशपांडे यांनी केले.या सात दिवसांच्या कालावधीत स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी जैनवाडीतील विविध सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर तसेच, राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांचा तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा आढावा घेतला.
याप्रसंगी ॲड. दीपक पवार, राहुल हातगिने, किरण दानोळे, प्रा.गणेश जमदाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी स्वयंसेवकांमधून कु.रुक्मिणी वरपे, कु.जया वाघमारे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. या शिबिरात आदर्श स्वयंसेवक विद्यार्थी म्हणून श्री.विशाल दीक्षित,कु.रुक्मिणी वरपे, कु.जया वाघमारे, यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी उमा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड,तसेच किरण आण्णासो दानोळे, भारत ज्ञानोबा गोफणे, अशोक आण्णासो मिरजे, दीपक देसाई, दत्तात्रय नागनाथ गोफणे, अशोक माणिक सदलगे, स्वप्निल किरण दानोळे, मल्हारी गोफणे, विलास गोफणे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विठ्ठल कावरे यांनी केले. कार्यक्रमाधिकारी सिंधू खिलारे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ तसेच वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.


