ज्यांनी चारी दिशांनी चार पक्ष बदलले विधानपरिषद व विधानसभेला पडले, सभासदांच्या मालकीचा कारखाना विकला, एक टक्केवारीवर भाड्याने दिला ते मला ऊसदरावर बोलत आहेत - आमदार अभिजीत पाटील.
आमची लढाई भाजपशी नाही - आमदार अभिजीत पाटील
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत माझी लढाई स्थानिक नेतेशी आहे भाजपशी नाही असे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा शुभारंभ मेंढापूर येथील दुध्देश्वर मंदिर येथे करण्यात आला.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण, जिल्हाध्यक्ष वर्षाराणी शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष पल्लवी पाटील, ॲड. दिपक पवार यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार अभिजीत पाटील म्हणाले की, ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची असताना विरोधी गटातील नेते विठ्ठल कारखान्यावर बोलत आहेत. विठ्ठल कारखान्यातील सभासदांचा माझ्यावर विश्वास आहे यामुळे विठ्ठल कारखाना निवडणूक व माढा विधानसभा निवडणुकीत मला यश मिळाले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक स्थानिक नेत्याविरुद्ध लढत आहे. मात्र हे नेते माझी लढाई भाजपची असल्याचा अपप्रचार करत आहेत. माझी लढाई भाजपशी नाही तर स्थानिक नेत्यांची असल्याचे आमदार अभिजीत पाटील म्हणाले.
मी घराणेशाहीला फाटा देत, शिंदे परिवाराचा ३० वर्षाची सत्ता उलथून टाकली व मायबाप जनतेने मला मतदानरुपी आशीर्वाद देऊन काम करण्याची संधी दिली व मी आमदार झालो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत. ज्यांनी चारी दिशांनी 4 पक्ष बदलले विधानपरिषद व विधानसभेला पडले, सभासदांच्या मालकीचा कारखाना विकला,1 टक्केवारीवर भाड्याने दिला ते मला ऊसदरावर बोलत आहेत. निवडणुकीमध्ये देखील माझ्या घरातील एकही उमेदवार या निवडणुकीमध्ये उभा केला नाही. समोरच्या बाजूला घराणेशाहीलाच पुढे करून उमेदवारी दिली आहे हे मतदारांनी ओळखायला हवे.
रणजीत शिंदे यांना माझे खुले आव्हान आहे की, त्यांनी शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर द्यावा. पंढरपूर व माढा तालुक्यातील काही नेते स्वतःच्या स्वार्थापोटी भाजपमध्ये गेले असून ते पालकमंत्र्यांना चाड्या लावण्याचे काम करत आहेत काही राजकीय नेते सभेमधून मी चुकून आमदार झालो असे सांगत आहेत. मात्र मी 30 हजार मतांनी होऊन अधिक मताने विजयी झालो आहे. त्यामुळे त्यांनाच बोलण्यास कोणताही विषय नसल्यामुळे ते विठ्ठल कारखान्यावर व माझ्या वैयक्तिक टीका करत असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद व पंचायत समितीची आहे. यामुळे निवडणुकीविषयी त्यांनी बोलावे विकासावर बोलावे असे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.
यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारांना सोलापूर जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मागे खंबीरपणे उभे राहावे विरोधकांच्या भूलथापाला पडी बळी पडू नका असे आवाहन यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.
यावेळी परिसरातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

