पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले.
रेल्वे मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या या शासकीय सोहळ्यात एकूण ३६ पथकांनी सहभाग घेतला होता. यावेळी पोलीस, गृहरक्षक दल, एनसीसी, स्काऊट तसेच शहरातील विविध विद्यालयाच्या विध्यार्थी-विद्यार्थ्यीनी यांच्या पथकाने केलेल्या संचलनाचे प्रांताधिकारी श्री. इथापे यांनी निरिक्षण करुन मानवंदना स्विकारली.
शासकीय ध्वजारोहण समारंभास आमदार अभिजीत पाटील, नगराध्यक्षा प्रणितीताई भालके, माजी आमदार प्रशांत परिचारक, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारीअमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, पोलीस निरिक्षक दशरथ वाघमोडे, नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड, दीपक शिंदे, डी.एस.आसवले, वैभव बुचके,
आणीबाणीत करावास भोगलेले लक्ष्मीकांत गडम, अशोक क्षीरसागर, श्रीमती. रुक्मिणी पांडुरंग देशपांडे, सुभद्रा मेटकरी, भालचंद्र कुलकर्णी यांच्यासह नगरसेवक, स्वांतत्र्यसैनिक, पदाधिकारी, शासकीय अधिकारी- कर्मचारी, तसेच मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संविधान उद्देशिकाचे वाचन करुन उपस्थितांना ध्वज प्रतिज्ञा, बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा देण्यात आली तसेच व्यसनमुक्तीची व कुष्ठरोगमुक्तीची शपथ घेतली. त्याचबरोबर पोलीस दलाच्या वतीने राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी इथापे यांच्या हस्ते सहभागी पथकांना प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात आले

