शेळवे प्रतिनिधी तेज न्यूज
शेळवे येथील सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्यू. कॉलेज येथे भारत देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन आज उत्साहात संपन्न झाला.
महाराष्ट्र पोलिस चे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी तथा जिल्हा पोलिस पतसंस्थेचे चेअरमन वामन पोपट यलमार तसेच त्यांच्या सौ. प्रितीताई वामन यलमार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,कमांडो ट्रेनिंग कोर्स च्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी केलेले पथ संचलन हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते.., ज्या पद्धतीने दिल्ली येथील लाल किल्ल्यावर परेड होत असते त्याच पार्श्वभूमीवर आज सनराईज पब्लिक स्कूल शेळवे च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट आणि नयनरम्य परेड करून पंचक्रोशीतील पालकवर्ग तसेच मान्यवर आणि प्रमुख पाहुण्यांचे लक्ष वेधले..,विद्यार्थ्यांनी सादर केलेली तलावरबाजी,लाठी काठी,रायफलिंग,दांडपट्टा या शिवकालीन साहसी कला अत्यंत रोमहर्षक तसेच डोळ्याचे पारणें फेडणाऱ्या ठरल्या.
"संदेशे आते है" या देशभक्ती पर गीतांवर सादर केलेल्या अप्रतिम अशी थीम्स,पि्रॅमिड्स,ऍक्टिव्हिटी न कळत पालक वर्ग तसेच उपस्थित मान्यवरांच्या डोळ्याच्या कडा ओल्या करून गेल्या, विद्यार्थ्यांचे अनुशासन, शिस्त आणि संस्कार पाहून खेड भाळावानी चे सेवानिवृत्त सैनिक गजेंद्र पवार तसेच प्रमुख पाहुणे वामन यलमार भारावून गेले व त्यांनी प्रत्येक बटालियन च्या ट्रूप कॅप्टन (सर्जेंट) शाल, हार, नारळ अन शैक्षणिक मदत देऊन विशेष सन्मान केला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत संस्थेचे अध्यक्ष समाधान गाजरे यांनी प्रशालेच्या यशाचा आलेख मांडला तसेच गुणवत्ता,शिस्त आणि सैनिकी प्रशिक्षण या बद्दलचे महत्व स्पष्ट केले. लवकरच सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शेळवे च्या नविन इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकांच्या मनोगतातून पिराची कुरोली चे शंकर शिंदे यांनी आज सादर करण्यात आलेल्या संचलनाचे कौतुक केले, तसेच सैनिकी प्रशिक्षण का आवश्यक आहे..?? त्याचे महत्व अधोरेखित केले,त्याच बरोबर कौठाळी गावचे सुपुत्र सागर गोडसे यांनी आपल्या पालक मनोगतातून सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे जस-जसे वय वाढत जाईल तस-तसा त्यांच्या प्रशालेच्या व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख वाढत असल्याचे सांगितले,प्रशालेच्या सर्वच कार्यक्रमात दरवर्षी काहीतरी वेगळेपण,नाविन्य आणि दर्जा असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र पोलिस चे वामन यलमार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रशालेच्या व्यवस्थापनाबाबत अभिमान व कौतुक व्यक्त केलं,कारण आज शिक्षणाचा बाजार होत असताना ग्रामिण भागातील आपली ही सनराईज प्रशाला माफक फी मध्ये दर्जेदार शिक्षण,सैनिकी प्रशिक्षण,शिस्त आणि संस्कार देण्याचे काम अगदी प्रामाणिकपणे करत असून पंचक्रोशीतील सर्वच पालकांनी प्रशालेस सर्व बाबतीत सहकार्य करावं व प्रशाला वाढवावी हे सांगत असतानाच मी या प्रशालेच्या सोबत खंबीरपणे उभा राहणार असून भविष्यात कोणत्याही स्वरूपात मदत करण्यासाठी मी कठीबद्ध असल्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव युवा ग्रामिण लेखक अंकुश गाजरे यांनी केले,तर संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत देखणे नियोजन संस्थेचे उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन गायकवाड यांनी केले तसेच कला व संगीत शिक्षक योगेश गायकवाड व मयूर भुमकर यांनी राष्ट्रगीत,झेंडा गीत देशभक्तीपर गिते यासाठी सुरेल साथ दिली,प्रशालेचे सह शिक्षक रामचंद्र मोकळे, सुभाष कौलगे व कबीर शेख यांनी विद्यार्थी शिस्त व मिडिया चे नियोजन केले,प्रशालेतील सहशिक्षिका मनिषा गोरे,दिपाली कुंभार,प्रियांका गाजरे,ऐश्वर्या भाईक,अश्विनी यलमार,अस्मातारा शेख,सौ.भिंगारे,सौ.बाबर,अदिती देठे,श्रुती भूमकर,कु.शेगावकर, सौ. कौलगे यांच्यासह प्रशालेचे सर्व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
सनराईज परिवाराची सर्वात जमेची बाजू म्हणजेच पालकांची बहुमोल साथ,प्रेम आणि आशीर्वाद,नेहमीप्रमाणे आज ही सदर कार्यक्रमासाठी मातांसह कार्यक्षेत्रातील 18 गावातून आदरणीय पालक बंधू,जेष्ठ -श्रेष्ठ नागरिक,नातेवाईक व मित्रपरिवार हजारोच्या संख्येने उपस्थित होता, प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यासाठी सोबत खाऊआणला होता, शेवटी तोच खाऊ व जलेबी वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

