सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
विद्या निकेतन शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रल या संस्थेचे अध्यक्ष सुशील महिंद्रकर यांना या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ध्वजारोहणाचा मान लाभला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्या निकेतन शाळेचे चेअरमन बापूसाहेब ढगे व मुख्याध्यापक गोपीनाथ नवले यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. महिंद्रकर यांच्या हस्ते ध्वजारोहण व झेंडा वंदन करण्यात आले.
यानंतर विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण व खाऊ वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त व सामाजिक जाणीव वृद्धिंगत व्हावी, असा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास भावसार व्हिजन इंडिया चे सचिव सागर पुकाळे, पदाधिकारी लक्ष्मीकांत मुसळे, श्रीकांत रंगदाळ, प्रभाकर जवळकर, सौ. माधुरी लोकरे, सौ. दीपा उपरे, अश्विन डोईजोडे व सुधीर क्षीरसागर उपस्थित होते.
शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत हा सोहळा शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

