पंंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे नुतन पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे हे नव्याने रुजू झाल्याने त्यांचा पत्रकार संरक्षण समिती पंंढरपूर च्या वतीने सत्कार समारंभ संपन्न झाला.
यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवानराव वानखेडे तसेच पत्रकार संरक्षण समितीचे ज्येष्ठ सल्लागार श्रीकांत कसबे, पत्रकार संरक्षण समितीचे शहराध्यक्ष लखन साळुंखे पत्रकार संरक्षण समितीचे शहर कार्याध्यक्ष सुदर्शन खंदारे तसेच ज्येष्ठ सदस्य शंकरराव पवार व सदस्य यांच्या हस्ते त्यांचा गुच्छ शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे पंंढरपूर तालुकाध्यक्ष जैनुद्दीन मुलाणी, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव, तालुका कार्याध्यक्ष सचिन दळवी, सदस्य प्रकाश सरताळे, रोहित जाधव, पत्रकार रामदास नागटिळक, नेताजी वाघमारे यांचेसह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.
पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे पत्रकार संरक्षण समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवानराव वानखेडे यांनी पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांची मुलाखत घेतली असता वाघमोडे यांनी सर्वप्रथम आपला व आपल्या कार्याचा परिचय करून दिला.
दशरथ वाघमोडे हे मुळचे इंदापूर तालुक्यातील गोंदी या गावचे रहिवासी असुन त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण अकलूज या ठिकाणी झाले. पुणे येथील मॉडर्न कॉलेज या ठिकाणी त्यांनी पोष्ट ग्रॅज्युएशन केले. पोलीस उपनिरीक्षक म्हणून 2005 रोजी त्यांची पहिली नियुक्ती हिंगोली या ठिकाणी झाली, त्यानंतर त्यांनी गडचिरोली, पिंपरी चिंचवड , लातूर पंढरपूर यासारख्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कर्तव्य बजावले आहे.
यावेळी पंढरपूर शहरात असणारे अवैध धंदे बंद करून सर्वसामान्यांना त्याचा त्रास होणार नाही याची त्यांनी दखल घ्यावी , शहर पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन आलेल्या सर्वसामान्य पंढरपुरकरांची तातडीने दखल घेऊन त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी व आलेल्या तक्रारदाराचे म्हणणे ऐकुन तातडीने तक्रार दाखल करून घ्यावी, असे पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने त्यांना आवाहन करण्यात आले.
उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे व वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहरातील अवैध धंदे बंद करून कुणाचीही गुंडगिरी व दादागिरी चालू देणार नाही व भाविकांना होणारा त्रास कमी केला जाईल, तसेच पंढरपूर शहरांमधील असणारे अवैध दारूधंदे, मटका जुगार व वाळूमाफिया यांच्यावर कठोर कारवाई करून सदरचे अवैद्य धंदे बंद केले जातील, जेणेकरून याचा कोणत्याही सर्वसामान्य व गरीब जनतेला त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल असे आश्वासन यावेळी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये नव्याने रुजू झालेले दशरथ वाघमोडे यांनी दिले.
तसेच पंढरपूर शहरातील असणारे चारही स्तंभ व्यवस्थित सांभाळून गोरगरीब जनतेला योग्य न्याय दिला जाईल व कोणावरही अन्याय होऊ देणार नाही व सर्वसामान्य जनतेला भयमुक्त वातावरण निर्मिती केली जाईल जेणेकरून गुन्हेगार आपले डोके वर काढणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असेही वाघमोडे यांनी सांगितले.
पंढरपूरच्या विठ्ठलाची सेवा करण्याची संधी मला मिळाली असून त्या संधीचे मी सोने करेन व भाविकांची सेवा मनोभावे करेल असेही ते आमच्या पत्रकाराशी बोलताना म्हणाले. तसेच मी माझ्या ऑफिसच्या समोर ठळकपणे सर्वसामान्यांसाठी एक मोठा असा बोर्ड लावणार असुन त्यावरती जो तक्रारदार येईल त्याचे समाधान झाल्याशिवाय तो परत जाणार नाही आणि जर समाधान झाले नाही तर मला प्रत्यक्षात भेटावे अशा आशयाचा मजकूर असेल. असेही वाघमोडे यांनी यावेळी सांगितले.
नुतन पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांना या अगोदर कोविडच्या कालावधीमध्ये 2018 ते 2020 या कालावधीत पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये ही त्यांनी काम केले असून त्यांना पंढरपूर शहराचा संपूर्ण इतिहास माहीत आहे, भुवैकुंठ पंढरीत कोरोना काळात त्यांना कार्य करण्याची उत्तम संधी मिळाली होती. याकाळात पंढरपुरकरांसह भाविकांची सुरक्षा व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. आज पुन्हा त्यांना पंढरीत कार्यकर्तृत्व बजावण्याची संधी मिळाली असुन ते या संधीचे निश्चितच सोने करतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
त्यांचे भुवैकुंठ पंढरी नगरीत स्वागत व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.


