पर्यावरण रक्षणासाठी सागर कुंजीर साहेबांचे योगदान कायम स्मरणात राहील:- लेकीच झाड टीम
झाड लावण्याच काम सोपं परंतु जोपासना करण्याच काम अवघड आहे ते काम मनापासून लेकीच झाड टीम करत आहे:- सागर कुंजीर
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
करकंब गावचे पोलीस अधिकारी आणि पर्यावरण प्रेमी सागर कुंजीर यांची करकंब शहरातून अकलूज या ठिकाणी बदली झाली.त्यानिमित्ताने करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम.व एकलव्य अभ्यासिका टीम, युगंधर आखाडा टीम,आणि शिवराज्य संघटनेच्या टीमच्या वतीने हॉटेल बासुरी येथे सह्रदय सत्कार आयोजित करण्यात आला होता.सुरुवातीला नंदलाल कपडेकर यांनी प्रास्ताविक करताना सागर कुंजीर यांनी झाडांसाठी अनमोल योगदान आणि एस.पी.अतुल कुलकर्णी यांची करकंब गावाची भेट आणि लेकीच झाड अभियान टीमला दिलेली उर्जा निश्चितच प्रेरणादायी ठरेल .
त्यानिमित्ताने ज्ञानेश्वर दुधाणे,पांडुरंग काटवटे, रमेश खारे,प्रमोद रेडे पाटील, हरिश्चंद्र वास्ते,राजू अनवते,यांनी मनोगतातून निसर्गाबद्दल असलेलं प्रेम आणि करकंब शहराला पोलीसांच्या माध्यमातून लावलेली शिस्त याविषयी महत्वपूर्ण बजावली,सांगत कायमस्वरूपी स्मरणात राहतील असे अधिकारी सागर कुंजीर यांचा सत्कार करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीने केला.
त्यावेळी सत्काराला उत्तर देताना सागर कुंजीर म्हणाले की झाड लावणे ही सोपी गोष्ट आहे परंतु त्यांचा सांभाळ करणं अतिशय कष्टदायी आहे.ती काम लेकीच झाड टीम करत असून मी त्याचा साक्षीदार असून मी बदलीने जरी दुसरीकडं गेलो असलो तरी मनाने कायम असणार असून कायमच सहकार्य राहील सांगितले.
युगंधर आखाडा आणि शिवराज्य टीमचही काम उल्लेखनीय असून शुभेच्छा दिल्या.आभार संतोष भोसले यांनी मानले.यावेळी विश्वजीत शिंदे,बापू खारे, देविदास काटवटे,नागेश खारे, चेतन पुरवत, विशाल बोधे,पिनू देशमुख,अक्षय नगरकर, विशाल बोधे,गणेश पिसे, धोंडीराम भाजीभाकरे, पृथ्वीराज धोत्रे,अमोल खारे,आदी वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

