भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील अष्टभुजा गणेश मंदिरात श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सकाळी उत्सव मूर्तीचा अभिषेक पुजारी अथर्व महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.त्यानंतर दुपारी १२ वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी भजनकारी मंडळीने भजनाचा कार्यक्रम आयोजित केला.त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील महिला भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
तसेच जय भवानी मंडळाच्या वतीने ही गणेश जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत किती अर्ज वैद्य झाले हे पाहा



