मुंबई प्रतिनिधी सुभाष मुळे तेज न्यूज
मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते शिक्षक पत्रकार जॉय एक्सप्रेस चे मुख्य संपादक गणेश हिरवे यांना नुकताच राय टीव्ही च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६ देऊन गौरविण्यात येणार असल्याचे मुख्य संपादक संजय राक्षसे यांनी कळविले आहे.
येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हा पुरस्कार हिरवे यांना प्रदान करण्यात येणार आहे.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावेळीं पुरस्कार देण्यात येणार आहे.
हिरवे यांचे सामाजिक कार्य वर्षाच्या बाराही महिने अविरतपणे सुरू असते.रक्तदान, पत्रकारिता, शैक्षणिक सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा यासाठी त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत.कोणताही पुरस्कार हा कौतुकाची थाप असून यामुळे आपली जबाबदारी अधिक वाढते आणि पुढे सकारात्मक कार्य करण्यासाठी पुरस्कार ऊर्जा देण्याचे काम करतात असे हिरवे यांचे म्हणणे आहे. पुरस्कार जाहीर झाल्याचे हिरवे सरांचे अनेकांनी अभिनंदन केलं आहे.


