पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री. रुक्मिणी विद्यापीठ संचलित मातोश्री ईश्वरामा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पंढरपूर यांनी मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने प्रशालेच्या हरित क्रीडांगणावर वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न.
प्रारंभी पंढरपूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे व संस्थापिका सुनेत्राताई विजयसिंह पवार यांचे शुभहस्ते प्रशालेतील क्रीडा सप्ताहात व हिंदी राष्ट्रभाषा पुणे यांनी घेतलेल्या हिंदी परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.तसेच प्राध्यापक गणेश डुबल. यांनी शाळेची प्रगती व तसेच शालेय उपक्रम व विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश याची माहिती दिली.
तर कलाविष्काराची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते स्टेज पूजन करून व पखवाज वादनाने करण्यात आली. या कलाविष्कारात इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावीच्या मुला मुलींनी भारुड, लावनी, सिनेगित, साक्षरता गीत, नाटिका यांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी मारुती लीगाडे यांनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत प्रशालेच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करून स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच कला नेतृत्व आणि सामाजिक कौशल्य शिकायला मिळतात असे सांगून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना भावनिक आधार मिळवण्याचे अशी संमेलने एक माध्यम असल्याचे सांगितले.
तर सुनेत्राताई पवार यांनी प्रशालेचा सन 2025=2026 या शैक्षणिक वर्षाचा सांस्कृतिक व क्रीडा विषयातील घडामोडींचा आढावा घेऊन सर्व शिक्षकांच्या कामाचे व विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले. व अशा संमेलनातून मुलांचे पुस्तकी ज्ञानाबरोबरच नेतृत्व गुण व आत्मविश्वास आणि सांघिक कार्य करण्याची क्षमता विकसित होत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमासाठी प्राचार्य नंदिनी गायकवाड. प्रशालेच्या माजी शिक्षिका वैशाली साळुंखे. सविता लोखंडे.फरहाना कादरी. यांचे सह प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग उपस्थित होते.या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा गणेश डूबल यांनी सांभाळली .आपल्या गोड वाणीने अभिजीत कोष्टी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी माधुरी बोडके, कुमुदिनी सरदार, पुंजाजी ढोले, इरफान शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

