वर्धा प्रतिनिधी तेज न्यूज
जिल्हाधिकारी वर्धा यांच्यामार्फत प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांना महाराष्ट्र राज्य किसान सभा वर्धा यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
नवी दिल्ली या आपल्या राजधानीच्या सर्व सीमांवर तब्बल 386 दिवस चाललेल्या विश्वकर्मा ऐतिहासिक किसान आंदोलनाचा नेतृत्व केलेल्या संयुक्त किसान मोर्चा व अखिल भारतीय किसान सभा यांचे राष्ट्रीय आव्हानावरून देशभर राष्ट्रीय विरोध दिवस पाळण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य किसान सभा या किसान आंदोलनाचा नेतृत्व करीत आहे.
आंदोलनाच्या मागण्या खालील प्रमाणे आहे या सूत्राच्या आधारे किसान आधार भावाला कायदेशीर हमी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफ करावे .आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला 25 लाख रुपये चे पॅकेज व सरकारी नोकरी द्यावी .शेतकरी विरोधी वीज बिल त्वरित मागे घ्या .शेतकरी विरोधी विज विधेयक 2025 त्वरित माझे घ्या. प्रस्तावित भारत अमेरिका व्यापार करार आणि इतर मुक्त व्यापार करार रद्द करा.शेती क्षेत्रातील त्रास दूर करण्यासाठी स्वतंत्र किसान बजेट सादर करा .कापूस सोयाबीन आणि तुरी साठी शासकीय खरेदीचे वचन पूर्ण करा. एक्सप्रेस औद्योगिक शहरे व खाणकामासाठी जबरदस्तीने भूसंपादन सुरू आहे ते थांबवा.
सदर मागण्यांचे निवेदन शासनास सादर करते वेळेस पुढील कार्यकर्ते हजर होते. कॉम्रेड द्वारका इमडवार गुणवंत डकरे ,रामभाऊजी दाभेकर ,राजू तेलतुंबडे , गजेंद्र सुरकार, मनोहर पचारे ,महिला किसान अधिकार च्या प्रा.नूतन माळवी, गजानन पखाले, मारोतराव इमडवार,विनायक नन्नवरे इत्यादी उपस्थित होते.

