पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने उमा महाविद्यालय,पंढरपूर येथे समर्पण दिवस साजरा करण्यात आला.
भारतातील युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद तसेच स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ यांची जयंती समर्पण दिवस म्हणून साजरी करण्यात आली.
याप्रसंगी राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. देशपांडे यांनी सर्वांचे स्वागत केले.प्रांत सहसचिव दीपक इरकल यांनी राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांचे जीवन चरित्र आणि ग्राहक चळवळीचा सिद्धांत याविषयी मार्गदर्शन केले. प्रांत सदस्य श्री विनोद भरते यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्यपद्धती आणि आजच्या काळात या चळवळीची गरज या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी उमा महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा सचिव सुहास निकते, तालुका अध्यक्ष नंदकुमार देशपांडे, तालुका सहसचिव आझाद अल्लापुरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.देशपांडे यांनी केले.


