अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज च्या कृषी कन्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बावडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी केली.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
समाजातील दुर्बल घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे.
“शिक्षणाचा दीप पेटविला,
नारीला नवा मार्ग दिला.
अंधारावर मात करणारी,
सावित्रीबाई अमर झाली.” लहान मुलींना गुलाब पुष्प देऊन बालिका दिन साजरा केला. यावेळी सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य तसेच स्त्री शिक्षणासाठी असलेले त्यांचे मोलाचे योगदान याबद्दल मुलांना माहिती सांगण्यात आली. यावेळी कृषीकन्या साक्षी बोराटे, सुनैना जाधव, प्राची कोंडलकर,श्रद्धा इंगोले, प्रतिक्षा जाधव, कीर्ती कोळी, अनामिका कोळेकर,श्रद्धा जाधव उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलावडे सर, तसेच प्रा.एस. एम. एकतपुरे सर , प्रा.एम. एम.चंदनकर सर आणि प्रा. एच. व्ही.खराडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

