पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी–पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभाग (EESA) आणि IEEE Student Branch SKNSCOE-Korti यांच्या संयुक्त विद्यमाने “रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग क्षेत्रातील विद्युत सर्किट्स” या विषयावर तज्ञ व्याख्यान उत्साहात संपन्न झाले.
या व्याख्यानासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. संकेत शिवाजी गोडसे, प्रशिक्षक, शासकीय टेक्निकल इन्स्टिट्यूट, सोलापूर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना विषयावरील सखोल व उपयुक्त मार्गदर्शन केले. त्यांनी रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग प्रणालींमध्ये वापरले जाणारे कंप्रेसर मोटर सर्किट, स्टार्टिंग व प्रोटेक्शन सर्किट, थर्मोस्टॅट, रिले, कॅपेसिटर तसेच कंट्रोल सर्किट्स यांची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे आयोजन प्रा. पी. बी. व्यवहारे यांनी समन्वयक म्हणून केले. तसेच या कार्यक्रमाला डॉ. के. शिवशंकर (IEEE विद्यार्थी शाखा सल्लागार व विभागप्रमुख, विद्युत अभियांत्रिकी),डॉ. के. जे. करांडे (प्राचार्य व कॅम्पस डायरेक्टर), डॉ. एस. जी. कुलकर्णी (उपप्राचार्य) यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाला विद्युत अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून व्याख्यानाचा लाभ घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग क्षेत्रातील विद्युत सर्किट्स, ऊर्जा कार्यक्षमता आणि औद्योगिक उपयोग याबाबत अद्ययावत व प्रत्यक्ष उपयोगी माहिती मिळाली.

