अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
माळशिरस तालुक्यातील प्रहार अपंग संघटनेच्या वतीने तरंगफळ गावचे अपंग रहिवासी असलेले त्यांना अकलूज सिविल हॉस्पिटल या ठिकाणी तीन चाकी सायकल भेट देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.
त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक विभाग मुख्तार भाई कोरबु , प्रहार अपंग संघटनेचे जिल्हा संघटक शहाजी देशमुख, संघटनेचे तालुकाध्यक्ष गोरख जानकर, बाळासाहेब लोखंडे, अमजद शेख सर्व बांधव यावेळी उपस्थित होते.
यावेळी नवीन वर्षाच्या सर्व अपंग बांधवांना मुख्तार भाई कोरबू यांनी शुभेच्छा दिल्या.

