कोरोना काळात पत्रकार संरक्षण समितीनं उल्लेखनीय कामगिरी बजावली - श्रीकांत कसबे
पंंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पत्रकार संरक्षण समितीचं कार्य अतिशय प्रामाणिकपणे व उत्साहाने संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान वानखेडे करत आहेत. त्यांच्या पत्रकारांच्या हितासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आमची कायम साथ असेल. जेंव्हा सन २०२० मध्ये जेंव्हा मला पत्रकार संरक्षण समिती च्या शहराध्यक्ष पदाची संधी मिळाली तेंव्हा कोरोनाची साथ होती, संपुर्ण जग ठप्प झालेलं होतं परंतु त्या काळात पण पत्रकार संरक्षण समितीनं पत्रकारांच्या कुटूंबियांना अन्नधान्य व जिवनावश्यक वस्तुंचे दर्जेदार कीट देऊन उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. अशी माहिती सा.जोशाबा टाईम्स चे संपादक श्रीकांत कसबे यांनी दिली. पंंढरपूर पत्रकार भवन येथे पत्रकार संरक्षण समितीच्या नुतन पदाधिकारी यांच्या निवडी झाल्या यावेळी अध्यक्षस्थानावरून श्रीकांत कसबे बोलत होते.
पुढे बोलताना कसबे म्हणाले की, पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान वानखेडे यांनी पत्रकारांना सन्मान मिळवून देण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले, परंतु मागील काळात काहीजण या संघटनेत पदासाठी आले अन् पदासाठीच संघटना सोडून गेले हे चुकीचं आहे. आता जे पत्रकार बांधव संघटनेत आहेत त्यांनी व नूतन पदाधिकारी यांनी कार्यशाळा, अभ्यासदौरे आयोजित करून संघटनेच्या कार्याला वेगवान ठेवावे.
यावेळी पत्रकार संरक्षण समिती च्या नुतन शहराध्यक्षपदी लखन साळुंखे 24 मराठी न्यूज नेटवर्क व (सा.महाराष्ट्र क्राईम न्यूज), शहर कार्याध्यक्षपदी सुदर्शन खंदारे (सा. पंढरी उदय) तर शहर उपाध्यक्ष पदी नागेश काळे ((महाराष्ट्र now 24) यांच्या निवडी करण्यात आल्या. तसेच पंंढरपूर तालुकाध्यक्षपदी जैनुद्दीन मुलाणी (सा.युवा राष्ट्रचेतना) , तालुका कार्याध्यक्षपदी सचिन दळवी (सा.जनपथ) , तालुका उपाध्यक्ष पदी लक्ष्मण जाधव (दै. दिव्य मराठी) यांच्या निवडी करण्यात आल्या. संघटनेच्या पंढरपूर सचिवपदी मिलींद गायकवाड (सा.पंढरपूर तालीम), सचिव पदी जोतीराम कांबळे (सा.पोलीस ऑफिसर), खजिनदारपदी अनिल सोनवणे (सा.जागर न्यूज), प्रसिध्दी प्रमुख पदी मुकूंद माने देशमुख (सा. गॅंगवार) व नागेश अधटराव ( सा. पोलीस टाईम्स) यांच्या निवडी करण्यात आल्या. निवडीनंतर सर्व नुतन पदाधिकारी यांचेसह संघटनेतील सर्वांचेच सत्कार करण्यात आले. माजी शहराध्यक्ष हुसेन नदाफ व नुतन शहराध्यक्ष लखन साळुंखे यांनी एकमेकांचे सत्कार करून भविष्यात संघटनेचं कार्य वाढवण्यासाठी मिळून प्रयत्न करू असे सुचित केले.
यावेळी प्रास्ताविक करताना संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान वानखेडे म्हणाले की, पत्रकारांनी पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणं हा पत्रकार संरक्षण समितीसचा मुख्य उद्देश आहे. पत्रकार संरक्षण समिती चे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे सर यांनी सुचित केल्या प्रमाणे पत्रकारांमध्ये हा लहान, तो मोठा, तो जुना हा नवा असा कोणताही भेदभाव न बाळगता आपापल्या परिसरातील सर्वच पत्रकारांच्या चौफेर विकासासाठी व सर्वांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व वार्तांकन करताना एकमेकांना सहकार्य करणेसाठीच पत्रकार संरक्षण समिती ही संघटना कार्यरत आहे. नुतन पदाधिकारी यांनी आपापसात सुसंवाद व समन्वय ठेवुन काम करावं, पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी नवनवीन उपक्रम राबवावेत, जर नुतन पदाधिकारी यांनी सक्रीय राहून काम केलेले दिसुन आले नाही तर ही कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात येईल असेही यावेळी अपत्रकार संरक्षण समिती चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान वानखेडे यांनी सुचित केले. यावेळी संघटनेचे जेष्ठ सदस्य शंकरराव पवार यांनीही मार्गदर्शन केले. तसेच नुतन शहर कार्याध्यक्ष सुदर्शन खंदारे व तालुका कार्याध्यक्ष सचिन दळवी यांनी लवकरंच संघटनेतर्फे पत्रकारांचा अभ्यासदौरा आयोजित करणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी लक्ष्मण जाधव यांनी निरोप या कवितेचं सादरीकरण करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक पवार यांनी केले तर आभार माजी शहराध्यक्ष हुसेन नदाफ यांनी मानले.
यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे जेष्ठ सदस्य गौतम जाधव, माजी अध्यक्ष यशवंत कुंभार, माजी अध्यक्ष झाकीर नदाफ, सागर भैय्या सोनवणे, संजय हेगडे, सलीम मणेरी, शरद कारटकर, अजिंक्य इंदापूरकर, रोहित जाधव, अमोल कुलकर्णी, डॉ.डी.डी पाटोळे, आदी उपस्थित होते.

.jpg)