सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत करकंब गावच्या सुपूत्राने मिळवला सन्मान लवकरच होणार राज्यस्तरावर सन्मान
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेन आयोजन करत सांगली येथील डाईट येथील अधिकाऱ्यांच्या योगदानतून जिल्हा परिषद शिक्षक,अधिकारी, यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी विविध ४२ प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
त्यामध्ये वाद्यवादन स्पर्धेत तालुका, जिल्हा, विभागीय स्पर्धेत प्रथम पाच क्रमांकाच्या स्पर्धकांची महाराष्ट्र राज्यस्तरीय पखवाज वाद्यवादन स्पर्धेत निवड झाली होती.त्यामध्ये सांगली येथील राजमाता महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे महाराष्ट्रातून एकूण ४० स्पर्धक सहभागी झाले होते.त्यामध्ये करकंब गावचे सुपुत्र आणि जळोली शाळेचे आदर्श शिक्षक आणि पखवाज वादक ज्ञानेश्वर दुधाणे यांची महाराष्ट्र राज्य स्तरीय पखवाज वादन स्पर्धेत पखवाजवादन करत त्यामध्ये उठान,कायदे, विस्तार ,चक्रदान,परण,आदीसादर करत प्रथम क्रमांक पटकावला लवकरच राज्यस्तरावर सन्मानचिन्ह देऊन आदरणीय मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात येणार प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
त्यांना लेहला साथ त्रिगुण पुजारी इचलकरंजी यांनी सुंदर केली.ज्ञानेश्वर दुधाणे आदर्श शिक्षक तर आहेतच सामाजिक बांधिलकी म्हणून करकंब येथे पर्यावरण रक्षणासाठी करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या माध्यमातून १००० वृक्षांच संगोपन करत आहेत.तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी एकलव्य अभ्यासिका सुरू आहे,तसेच भारतभर मोठमोठ्या संगीत महोत्सवामध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय किर्तीचे ख्यातनाम गायक पं.शौनक अभिषेकी आणि इतर सर्व कलाकारांना पखवाज साथसंगत केली आहे.शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय काम करत असून भुसनरवस्ती,आजोती, दिवाणमळा, वाफळकरवस्ती, आणि आता जळोली शाळेतही दर्जेदार शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत.
या राज्यस्तरीय यशाने गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे साहेब, केंद्रप्रमुख पा.वा.जाधव.तसेच करकंब ,जळोली शाळा शिक्षक स्टाफ ,व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी शिक्षक शिक्षिका आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

