पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने फाटे ट्रॅक्टर कोर्टी पंढरपूर येथे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजित दादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले की, अजित दादांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत विकासाची मोठी कामे केली आहेत. प्रशासनावरील पकड आणि कामाचा धडाका यांमुळे त्यांची ओळख 'लोकनेता' म्हणून सर्वत्र आहे. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत उपस्थितांनी शोक व्यक्त केला.
या प्रसंगी नागेश फाटे बोलताना म्हणाले "आज आमचे लाडके नेते अजितदादा यांच्याबद्दलच्या या दुर्दैवी वृत्ताने मन सुन्न झाले आहे. दादा म्हणजे केवळ एक नेते नव्हते, तर ते आम्हा कार्यकर्त्यांसाठी एक आधारवड होते. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत जनतेच्या सेवेसाठी झटणारा असा 'कामाचा माणूस' पुन्हा होणे नाही.
प्रशासकीय शिस्त आणि शब्दाला जागणारा नेता कसा असावा, हे आम्हाला दादांकडून शिकायला मिळाले. आज दादा आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाहीये, पण त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेली विकासाची दृष्टी आम्हाला कायम प्रेरणा देत राहील. आमच्या आयुष्यातील ही कधीही न भरून निघणारी पोकळी आहे. दादा, तुम्ही आमच्या मनात कायम जिवंत राहाल." असे नागेश फाटे म्हणाले.
या श्रद्धांजली सभेला गोरख बागल, संजय पवार, गणेश दुरुगकर, भास्कर गायकवाड, गुलाब मुलांणी, अभिमन्यू पवार , डॉ रमेश फाटे,डॉ.माणिक मस्के,भारत घोडके सर,औदुंबर माने,शुभम फाटे, संतोष पुणेकर, ओंकार कथले, बेबन आदमील मॅडम, समाधान कांबळे, समाधान बागल, विशाल मोरे, किशोर नपते, शरद थिटे, ऋषिकेश बागल, नागेश काळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

