पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
उमा महाविद्यालय पंढरपूर व पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने "आपत्ती व्यवस्थापन "या विषयावर भूगोल विभागाने चर्चासत्र तसेच इंग्रजी विभाग बी.ए भाग दोन,शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मधील एन ए पी च्या पुनर्रचित अभ्यासक्रमावरती कार्यशाळा दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे प्र.कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा होते. याप्रसंगी त्यांनी " विद्यापीठाच्या विकासाबरोबर सर्व महाविद्यालयाचाही संशोधनात्मक दृष्टीने विकास व्हावा. यासाठी विद्यापीठ आवश्यक ते सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे."असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त,माजी प्राचार्य डॉ मिलिंद परिचारक हे होते.त्यांनी आपल्या मनोगतातून,"शिक्षकाने आपल्या अध्यापनात संशोधन दृष्टीने सतत नाविन्यपूर्णतेचे प्रयोग केले पाहिजेत. तसे अध्यापन आनंददायी असते.त्यामुळे ते विद्यार्थ्यांच्या काळजाला भिडते आणि मनामध्ये ऊर्जा निर्माण करते.असे प्रतिपादन केले. यावेळी (अध्यक्ष सोलापूर जिल्हा भूगोल शिक्षक संघ)माजी प्राचार्य डॉ. शिवराया आडवीतोट यांनी आपल्या मनोगतातून ,"निसर्गा बरोबर मानवाचा विसंवाद होत आहे. निसर्ग आपल्याला भरभरून देतो. परंतु आपण त्याची निगा राखत नाही.असे प्रतिपादन करून पुढे त्यांनी जीवनाच्या सर्वच क्षेत्रातील प्रदुषणाची गंभीरता विशद केली.
या कार्यक्रमावेळी प्रो.डॉ मनोहर जोशी, यांनी आपल्या मनोगतातून," भारतातील इंग्रजी भाषेच्या उच्चारातील विविधता " याविषयी विवेचन केले.या चर्चासत्र व कार्यशाळेसाठी डॉ.संभाजी शिंदे,प्रो.डॉ.दीपक ननवरे, डॉ.हनुमंत आवताडे डॉ.नेताजी कोकाटे हे साधन व्यक्ती,तसेच विरभद्र दंडे, उमा शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य बागवान जे.एस, या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
या कार्यक्रमातील उपस्थितांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धीरजकुमार बाड यांनी केले.प्रास्तावीक इंग्रजी विभाग प्रमुख डॉ अविनाश देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ दत्ता सरगर,प्रा.सुधीर कसगावडे यांनी केले.उपस्थितांचे आभार भूगोल विभागाचे प्रमुख डॉ.गोविंद भोसले यांनी मानले.या चर्चासत्र व कार्यशाळेस विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

