भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
भाळवणी. तालुका पंढरपूर येथे सर्वपक्षीय व ग्रामस्थांच्या वतीने. दिनांक 29/1/2026 रोजी वार गुरुवार सकाळी 10:00 वाजता.शाकंभरी देवीच्या सभा मंडपात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
बारामती येथे विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे काल सकाळी दुःखद निधन झाले .त्यांना २ मिनिट शांत उभा राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगार, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून काम करणारा एक धाडसी नेता. आपणा सर्वांना सोडून गेल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या.प्रशासनावर, मजबूत पकड असणारा असा हा नेता होता.
संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून अजित दादा पवार यांच्या जाण्याने सर्व.च क्षेत्रातील फार मोठे नुकसान झाले आहे.असा नेता पुन्हा होणे नाही अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. पवार, कुटुंबीयांना या दुखातून सावरण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना. पांडुरंग चरणी करण्यात आली .
यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.



