शेळवे प्रतिनिधी तेज न्यूज
सनराइज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शेळवे येथे वार्षिक क्रीडा सप्ताहाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाच्या प्रमुख अतिथी म्हणून पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रेखा घनवट व सुनिता संग्राम गायकवाड तसेच त्यांच्या सोबत भंडीशेगाव येथील विद्यमान पोलिस पाटील व मा. सरपंच शितल कस्तुरे या होत्या.
प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे संचलन करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली, तसेच लाठी काठी, दांडपट्टा यासारखी धाडसी प्रात्यक्षिक सादर केली,उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते क्रीडा सप्ताह, क्रीडा साहित्य व क्रिडांगणा चे उदघाटन करण्यात आले
सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या नियोजित नविन इमारतीच्या पुढे अत्यंत आकर्षक व प्रशस्त असे हे क्रीडा मैदान तयार करण्यात आले असून त्याठिकाणी 300 मिटर चा रनिंग ट्रॅक, हॉलिबॉल, क्रिकेट, कब्बडी,खो-खो, लांब उडी, उंच उडी, गोळा, थाळी, भाला फेक तसेच नेमबाजी साठी सर्व सोयी सुविधानी युक्त असे मैदान तयार करण्यात आले आहे,त्याच मैदानावर प्रशालेच्या मुलांचा खो-खो, कब्बडी, क्रिकेट व रनिंग चा सराव घेतला जातो.
पंढरपूर पोलिस स्टेशन च्या पोलीस निरीक्षक रेखा घनवट यांनी मुलांचे संचलन, शिस्त आणि प्रशालेत सुरु करण्यात आलेल्या सैनिकी प्रशिक्षणाच्या बाबत कौतुक केले तसेच अभ्यासाच्या बरोबर आहार, खेळ याचेही महत्व पटवून सांगितले, शाळेतील शिक्षक,विद्यार्थी यांचे मराठी सह इंग्रजी भाषेवर असलेले प्रभुत्व ही त्यांनी अधोरेखित केले.
सुनिता गायकवाड यांनी आपल्या भाषणातून प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा डंका पंचक्रोशीत सर्वत्र असल्याचे सांगितले,त्याच बरोबर क्रीडास्पर्धा, वक्तृत्व, कला याही क्षेत्रात सनराईज चे विद्यार्थी अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष समाधान गाजरे यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव अंकुश गाजरे यांनी मानले, कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन संस्थेचे उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन गायकवाड तसेच योगेश गायकवाड यांनी केले तर क्रीडासप्ताह यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभाग तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक, कर्मचारी हे प्रामाणिक कष्ट घेत आहेत.
सदर स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची विभागणी सनराईज टायगर, सनराईज पँथर्स, सनराईज लॉयन, सनराईज जागवार अशी विभागणी केली असून,सप्ताहात खो-खो, कब्बडी, क्रिकेट, रस्सी खेच, नेमबाजी, रनींग, हॉलिबॉल, लंगडी, प्रश्नमंजुषा, वादविवाद ई स्पर्धा होणार असल्याचे क्रीडा विभागाकडून जाहीर करण्यात आले.


