सुस्ते प्रतिनिधी तेज न्यूज
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित, श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय सुस्ते, प्रशालेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालय, मुंबई यांचेवतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले आहे.
इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेमध्ये प्रशालेतील 28 विद्यार्थी तर एलिमेंटरी परीक्षेमध्ये 14 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेच्या शंभर टक्के उज्वल निकालाची परंपरा कायम राखली गेली आहे. इंटरमिजिएट परीक्षेत 'अ' श्रेणीमध्ये 2, 'ब' श्रेणी मध्ये 19 तर 'क' श्रेणीमध्ये 7 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. तसेच एलिमेंट्री परीक्षेमध्ये अ श्रेणीमध्ये 4, ब श्रेणी मध्ये 8 तर 'क' श्रेणीमध्ये 2 विद्यार्थ्यांनी यश संपादले आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना कलाध्यापक श्रीकांत चंदनशिवे सर यांचे मार्गदर्शन लाभले. चित्रकला ग्रेड परीक्षेमध्ये यशवंत झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे व त्यांना मार्गदर्शन करणारे कलाशिक्षक चंदनशिवे यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर, उपाध्यक्ष शिवाजी वाघ, सचिव ॲड. वैभव टोमके, सहसचिव अजित नडगिरे, खजिनदार सलीम वडगावकर, जेष्ठ संचालक आप्पासाहेब चोपडे, दिलीप घाडगे, अनिरुद्ध सालविठ्ठल, विजयकुमार माळवदकर, सुनीता मोरे, प्रशालेचे प्राचार्य अविनाश कटकधोंड, पर्यवेक्षक सुरेश कट्टे, जेष्ठ लिपिक राजकुमार ढगे, शिक्षकेतर प्रतिनिधी नागनाथ मैंदर्गी, पालक,ग्रामस्थ यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी मंगलमय सदिच्छा व्यक्त केल्या.


