माढा प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथील राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी श्रेयस टिंगरे याची राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचलन (परेड) साठी निवड झाली आहे.
दि. 26 जानेवारी 2026 रोजी शिवाजी पार्क दादर, मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचलन (परेड) साठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्यामार्फत विद्यापीठ निवड समितीद्वारे व नंतर गुजरात येथील शिबिरामधून त्याची प्रजासत्ताक दिन संचलनासाठी निवड झालेली आहे. निवड झालेला विद्यापीठातील तो एकमेव विद्यार्थी आहे.
या त्याच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन मा. संजीव पाटील एन. एस. एस. विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घनश्याम हराळे उपप्राचार्य प्रा. अशोक लोंढे व राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी डॉ.दत्तात्रय काळेल यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

