पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही. मात्र जिल्हा परिषद गटासाठी 87 नामनिर्देशन अर्जाची (फॉर्म) विक्री झाली आहे. तर पंचायत समिती गणासाठी 70 नामनिर्देशन अर्ज (फॉर्म) विक्री झाली असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यात 8 जिल्हा परिषद गट व 16 पंचायत समिती गणासाठी निवडणूक प्रक्रिया शुक्रवार दि. 16 पासून सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. मात्र इच्छुकांनी नामनिर्देशन पत्र (अर्ज) घेतले आहेत. ऑफलाईन पध्दतीने उमेदवार अर्ज भरु शकतात.
नामनिर्देशन पत्र भरण्याचा कालावधी दि. 16 ते 21 जानेवारी 2026 पर्यंत आहे. नामनिर्देशनपत्र छाननी दि.22 जानेवारी रोजी तर याच दिवशी यादी प्रसिध्द होणार, दि. 23 ते 27 उमेदवारी अर्ज माघार, दि. 27 रोजी अंतिम उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप, मतदान दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते 5.30 वा. पर्यंत, मतमोजणी दि. 7 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे.

