संग्रामनगर प्रतिनिधी केदार लोहकरे तेज न्यूज
प्राथमिक शाळा क्रमांक ३ माळीनगर (गट नं.२) येथे बाल आनंदी मेळावा आणि हळदीकुंकू कार्यक्रम आनंदात व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल मांडून वस्तू विक्रीचा आनंद घेत व्यवहार ज्ञान शिकले.यामध्ये भाजीपाला,फळभाज्या, स्टेशनरी, फळे,थंड पेय,खाण्याचे पदार्थ इत्यादी वस्तू होत्या.
यामध्ये दि.सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन रंजनभाऊ गिरमे,संस्थेचे सेक्रेटरी अजय गिरमे साहेब आणि सर्व संचालक मंडळ तसेच पालक, ग्रामस्थ यांनी या उपक्रमामध्ये विद्यार्थ्याकडून बाजार घेऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला. श्रीपुर-महाळुंग नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.लक्ष्मी चव्हाण तसेच नगरसेविका सौ.ज्योस्ना सावंत पाटील सौ.कल्पना काटे उपस्थित होत्या.त्याचबरोबर शाळेच्या महिला पालकांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यामध्ये सर्व माता-भगिनींनी कार्यक्रमात सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा आनंद लुटला.
अशा प्रकारे दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक शाळा क्रमांक ३ माळीनगर-गट नंबर २ आनंदीमय वातावरणात हळदी कुंकू कार्यक्रम व बाल आनंदी बाजार (मार्केट डे) पार पडला.कार्यक्रमाचे मनोगत शाळेच्या कार्यतत्पर आदर्श मुख्याध्यापिका सौ.ललिता नागटिळक यांनी केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.वंदना बंडगर यांनी केले तसेच कार्यक्रम पार पाडण्यासाठी सौ.उज्वला देवकाते,वैजीनाथ भोसले,गोविंदा काळे,श्रीम.स्मिता म्हेत्रे,सौ.गौरी शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाचे आभार प्रवीण खरात यांनी मानले.

