मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
नव्या वर्षाचा (2026) आजचा पहिला आहे. नवीन सुरुवात होताच महागाईचा फटका बसला आहे. 1 जानेवारीला सरकारने महत्वपूर्ण आणि रोजच्या वापरातल्या गोष्टीची किंमत वाढवली आहे.
सरकारने एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 111 रुपयांची वाढ जाहीर केली असून ही वाढ आजपासून लागू झाली आहे. हे 19 किलो वजनाच्या कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीतील वाढ आहे. कमर्शियल सिलेंडर महाग झाल्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट तसेच छोट्या व्यावसायिकांचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.
नव्या दरांनुसार, दिल्लीत 19 किलोचा कमर्शियल एलपीजी सिलेंडर आता 1,691.50 रुपयांना मिळणार आहे. याआधी त्याची किंमत 1,580.50 रुपये होती. कोलकात्यात हा सिलेंडर 1,795 रुपयांचा झाला असून पूर्वी 1,684 रुपये होता. मुंबईत कमर्शियल सिलेंडरची किंमत आता 1,642.50 रुपये आहे, जी आधी 1,531 रुपये होती.

