पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील 8 जिल्हा परिषद व 16 पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल झाले होते. जिल्हा परिषदेसाठी 158 अर्जापैकी 5 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या 8 जागेसाठी 153 अर्ज वैध ठरले आहेत. तर पंचायत समितीच्या 16 जागेसाठी 267 अर्ज दाखल झाले होते. या अर्जांपैकी 255 वैध ठरले असून 12 अर्ज नामंजूर ठरविण्यात आले आहेत. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन लंगुटे यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यात होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया गुरुवारी पंढरपूर येथील तहसील कार्यालयात पूर्ण झाली.
जिल्हा परिषद भाळवणी गटातून 2 अर्ज नामंजूर ठरले असून 13 अर्ज वैध ठरले आहेत. तर टाकळी गटातून 2 अर्ज नामंजूर ठरले असून 25 अर्ज वैध ठरले आहेत. तसेच कासेगाव गटातून 1 अर्ज नामंजूर ठरला असून 23 अर्ज वैध ठरले आहेत. मात्र, करकंब 15, भोसे 13, रोपळे 19, वाखरी 26 सर्व अर्ज वैध ठरले आहेत.
पंढरपूर पंचायत समिती गणात सुस्ते गणात 4 अर्ज नामंजूर ठरले आहेत. वाखरी गणातून 1, भाळवणी 2, पळशी 2, खर्डी 2, कासेगाव 1 असे 12 अर्ज नामंजूर झाले आहेत. तर ऊर्वरित गणातील सर्वच्या सर्व अर्ज वैध ठरले आहेत.



