पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
भाजपचे सोलापूर जिल्ह्यातील युवक नेते ऍडव्होकेट प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी शुभेच्छा देताना माजी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले की रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे आणि आजच्या तरुणाईने समाजभान जपत अशा स्तुत्य उपक्रमांचे आयोजन करणे कौतुकास्पद आहे. प्रणवच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवकांनी घेतलेला हा पुढाकार समाजासाठी प्रेरणादायी ठरेल असे म्हणत प्रणव परिचारक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट,डॉक्टर अनिकेत देशमुख,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिष गायकवाड यांच्यासह पांडुरंग परिवारातील विविध नेतेमंडळी तसेच भाजपचे विविध पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. पांडुरंग परिवार युवक आघाडीच्या वतीने आयोजित या रक्तदान शिबिरात पंढरपूर शहर व तालुक्यातील तरुणांनी समर्थकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे.


