पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज अमोल कुलकर्णी
जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या खर्डी येथे देशी दारू,हातभट्टीची दारू,जुगार मटका, शिंदी,असे अनेक अवैध व्यवसाय केली अनेक वर्ष चालू असल्याचे ग्रामस्थांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते तथापि त्या अवैध व्यवसायावर कोणतीच कारवाई पोलिसांकडून केली जात नव्हती.
शेवटी काही सामाजिक कार्यकर्ते व तरुणांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक टी वाय मुजावर यांच्या देखरेखी खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वडणे व यांच्या सहकारी पोलीस टीमने खर्डी येथे अवैध व्यवसायावर छापेमारी करून अनेक ठिकाणी मुद्देमाल जप्त करत काही स्थानिक व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केल्याचे वृत्त आहे.
सदर कारवाई करत असताना गावातील वाड्यावसत्या तसेच गावठाण हद्दीत चालणारे सर्व अवैध व्यवसाय मावा,गुटखा, दारू या सर्व व्यवसायांवर छापेमारी करत सर्व अवैध व्यवसाय करणाऱ्यांना समज देऊन ताकीद देण्यात आली.
या पोलीस कारवाईचे कौतुक सर्वत्र होत असून सदर कारवाई केवळ फार्स ठरू नये अशी अपेक्षा ग्रामस्थ करीत आहेत.तसेच अशी कारवाई तालुक्यातील इतर गावात सुध्दा सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थान कडून केली जात आहे
गावाचे पावित्र्य लक्षात घेऊन सदर व्यवसाय पुन्हा न वाढू देण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.तथापि चालू काही महिन्यातच ग्रामपंचायतची निवडणूक लागणार असल्याने अनेक अवैध व्यवसायांचे वरदहस्त असणाऱ्या नेत्यांचे धाबे दणाणले आहे.काही व्यवसायिक हे लाखो रुपयांचे हप्ते देऊन काही स्थानिक नेते पुढारी यांच्या माध्यमातून पोलिसांना अर्थपूर्ण सहकार्य करत असल्याचे निदर्शनास आले.
तसेच गावात अनेक तंटे निर्माण होऊ लागले.अनेक महिलांचे बचत गटाची कर्जे वाढू लागली. पण तरुणांच्या आक्रमक भूमिकेमुळे आजी-माजी तरुण पुढाऱ्यांनी गावात बसणे थांबणे बंद केले आहे.त्यांची मिलीभघत असल्याने अनेकांची तोंडे शरमेने खाली गेली आहेत. सदर बाबींचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मुजावर करत असून त्याचे अधिकृत गुन्हे नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे समजते.


