टेंभुर्णी प्रतिनिधी तेज न्यूज
टेंभुर्णी प्रेस क्लबचे अध्यक्ष अमरसिंह शेंडे यांच्या सूचनेनुसार व उपाध्यक्ष धनंजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली टेंभुर्णी प्रेस क्लबची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाली.
उपस्थित सभेमध्ये सन २०२६ साठी नूतन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी सतीश विठ्ठल चांदगुडे, उपाध्यक्षपदी विष्णू भाऊ बिचकुले, सचिवपदी राजेंद्र कांतीलाल केदार तर खजिनदारपदी अनिल भागवत जगताप यांची निवड करण्यात आली. नूतन निवडीचा प्रस्ताव सोपान ढगे यांनी मांडला असून त्यास सुहास साळुंखे यांनी अनुमोदन दिले. उपस्थित सर्व सदस्यांनी या निवडीस एकमताने पाठिंबा दिला.
सदर सभेमध्ये टेंभुर्णी प्रेस क्लबचे नूतन उपाध्यक्ष विष्णू बिचकुले यांची आंतरराष्ट्रीय हिंदू सनातन महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
वार्षिक सभेत डी. एस. गायकवाड, सदाशिव पवार, सोपान ढगे, सुहास साळुंखे, विष्णू बिचकुले, सतीश चांदगुडे, गणेश चौगुले, सतीश काळे, धनंजय मोरे, राजेंद्र केदार, सचिन होदाडे, अनिल जगताप, सुरज देशमुख आदी पत्रकार सदस्य उपस्थित होते. सभेच्या शेवटी नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्व सदस्यांच्या वतीने अभिनंदन करून सभा संपन्न झाली.

