पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाने आयईईई महाराष्ट्र विभागाअंतर्गत आयईईई विद्यार्थी शाखा, एस.के.एन.एस.सी.ओ.ई कोर्टी, पंढरपूर यांच्या सहकार्याने दि. १५ ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत “द आर्ट ऑफ प्रोफेशनल ग्रोथ: अ फॅकल्टी इनरिचमेंट प्रोग्राम" या विषयावर एक आठवड्याचा इंटरनॅशनल ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांनी दिली
हा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम दररोज सायंकाळी ६.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत ऑनलाइन माध्यमातून पार पडला. या कार्यक्रमामध्ये देश-विदेशातील नामांकित शिक्षणतज्ज्ञ व व्यावसायिकांनी अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली.
या मध्ये डॉ. एस. प्रभाकर कार्तिकेयन (व्हीआयटी युनिव्हर्सिटी, वेल्लोर), डॉ. सौविक गांगुली (थापर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, पटियाला), डॉ. सनी एस. सोनंदकर (लॉफबरो युनिव्हर्सिटी, यूके), डॉ. उर्मिला बंडारू (टेश अकॅडमी, इंटरनॅशनल कन्सल्टंटस), डॉ. सुशील सुभाष कर्वेकर (वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली) तसेच श्री. धनुर्धर अर्जुन दास (उपाध्यक्ष, इस्कॉन पंढरपूर) यांनी प्रमुख वक्ते म्हणून सहभाग घेतला.
या सत्रांमध्ये संशोधन पद्धती, नवोपक्रम, कृत्रिम बुद्धिमत्ता, व्यावसायिक उत्कृष्टता तसेच ताण व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी प्राध्यापकांना व्यावसायिक विकासासाठी उपयुक्त अशा विविध कौशल्यांची माहिती मिळाली.
या कार्यक्रमाचे सर्व नियोजन विभाग प्रमुख डॉ. के. शिवशंकर यांनी केले तसेच संयोजन प्रा. एम. आर. खडतरे (समन्वयक) आणि प्रा. के. पी. जाधव यांनी केले. आयोजन समिती सदस्य प्रा. विनोद पी. मोरे, प्रा. अंजली ए. चांदणे, प्रा. अमोल एन. गोडसे, प्रा. दत्तात्रय एम. कोरके, प्रा. सोनाली डी. घोडके, प्रा. प्रदीप बी. व्यवहारे, प्रा. अर्जुन आर. मासाळ आणि प्रा. एन. व्ही. खांडेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत मोलाचे सहकार्य केले.
सहभागी प्राध्यापकांनी समाधान व्यक्त करत हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त, प्रेरणादायी आणि व्यावसायिकदृष्ट्या समृद्ध करणारा असल्याची भावना व्यक्त केली.या इंटरनॅशनल ऑनलाइन एफडीपीच्या च्या यशस्वी आयोजनाबद्दल प्राचार्य डॉ.कैलाश जगन्नाथ करांडे यांनी कौतुक केले.

