सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापुरातील जीनियस स्मार्ट किड अबॅकस ची व के एल ई इंग्लिश मीडियम स्कूल ची इयत्ता चौथीतील स्वेतलाना डायना संदीप आडके हिला २८ डिसेंबर २०२५ रोजी पुणे येथे झालेल्या स्मार्ट किड अबॅकस लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड च्या पंधराव्या राष्ट्रीय व आठव्या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेमध्ये 'क' गटामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
जीनियस स्मार्ट- किडच्या संचालिका गीतांजली मुळे यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. स्वेतलाना ही अभ्यासात हुशार असून तिने चित्रकलेत अनेक बक्षीसे मिळवलेली असून ती एक उत्तम ड्रम वादक देखील आहे. या तिच्या यशाबद्दल के एल ई इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक सतीश हिरेमठ व शिक्षिकांनी कौतुक करून तिचा आदर्श इतर मुलांनी घ्यावा असे आवाहन केले.


